आज दिसे मज क्षितिजावरती एक शुभ्र तारा
काळरात्रिचे वादळ सरले, शांत जाहला वारा
या राखेतुनि का न फुलावे पुन्हा तसेच निखारे
जाणुनि घ्याया सवाल करती माझे मला उसासे
अशीच झरते आठवण वेडी, फुटे बांध जखमांचा
तुटली निद्रा, असा वाहुनी गंध मुक्या स्वप्नांचा
अपुले परके, घर दाराचे, कशी बदलली नाती
खात्री मात्र आहे मजला, असति निकट सांगाती
अरुणोदय तो होण्यासाठी निमिष राहिले थोडे
स्वागत करण्या नव पर्वाचे मन माझे आतुरले
No comments:
Post a Comment