Showing posts with label Poems - Marathi. Show all posts
Showing posts with label Poems - Marathi. Show all posts

Thursday, September 30, 2021

Dating a Skeptic ... 2021


It is rare to find a poem that addresses a skeptic/atheist. I came across a delightful one in Marathi (see at the bottom of this post), and had fun translating it into English.

Dating a Skeptic

Though you're a skeptic
I drag you to the temple
And you come along
Just for my satisfaction

I do the rituals
With offerings to the altar
While you give alms
To beggars at the entrance

I strive to get ahead
For a good view of the altar
While you relish the beauty
Of the temple architecture

Annoyingly I nudge you
To bow your head in reverence
While you are busy enjoying
The tranquility of the temple

I worry about the footwear
We had to leave outside the door
You say, "A needy one may take them"
And we can walk barefoot home

I wonder who's the one
To be blessed by my god
The believer in me, or
The skeptic in you

The Marathi original (poet unknown):

तू नास्तिक असूनही तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू

हारफुलांचा भाव करत
ताट घेणारी मी,
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू

रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी,
देवळाची सुबकता
न्याहाळणारा तू

चिडून नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी,
देवळातील प्रसन्नता
अनुभवणारा तू

देवळातही चपलेची
काळजी करणारी मी,
गरजूने नेली असेल
म्हणून अनवाणी चालत निघालेला तू

खरंच....देव नक्की कुणाला पावत असेल?
माझ्यासारख्या आस्तिकाला...
की तुझ्यासारख्या नास्तिकाला....?

Saturday, August 2, 2014

पाउस … २०१४

मुंबईतला काय, न्यू जर्सीतला काय, तोच मजेशीर, मुसळधार पाउस
तो व्यर्थ झाला लहानपणच्या संयमात, तर हा बहरतोय तारुण्याच्या धुंदीत

मानलेल्या ह्या  देशात नाही सौंदर्याची कमी,
भूतकाळाच्या आठवणी ठेऒन, मी वर्तमान गमावणार नाही!

"केस ओले होतील …", आता त्याची काळजी नाही
सर्दी खोकला, कावीळ मलेरिया, आता त्याची पर्वा नाही

"लहानपण देगा देवा", कुणी थोर म्हणून गेला
बिचाऱ्याने तारुण्याची, नसेल कधी चाखली हवा

मेंढरासारखा  बालपणी, मीही गेलो टिटवाळ्याला
नळाला कान लावला, पंढरपूरचा मृदंग ऐकला

वात्रट आम्ही, घरी येउन, दादरच्या नळाला कान दिला
काय आश्चर्य! विठोबा तेथेही नळात भेटला!

कालच कुणी घाबरत विचारले, "Club-55ला येणार का?"
माझे तुरंत त्याला उत्तर, "Club-25ची पायरी चढायचीय अजून आम्हाला"

कीव येते त्यांची, जे जन्मतारखेने आपली वयं मोजतात
पर्वतीची गुलाबी थंडी कानटोपीने दूर ठेवतात

स्वैर मनाने भिजावे, मुक्त दिलाने रहावे
आजचे  हे मौल्यवान क्षण, हातात जपून ठेवावे









Wednesday, July 16, 2014

तोच चंद्रमा नभात ... an optimistic adaptation ... 2014

For decades, I have felt uneasy about the sad second half of the beautiful Marathi song by Shanta Shelke, immortalized by Sudhir Phadke. I finally decided to change its complexion and make it positive and celebratory. Here is the original, and my changes:

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी 
It's the same moon in the sky, it's the same Spring night
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी 
In solitude, near me, is your same beautiful sight

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे 
It's the same stillness, it's same romantic moonlight
छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे 
It's the same beautiful painting, drawn by your silhouette
जाईचा कुंज तोच, तीच गन्धमोहिनी 
It's the same jasmine bush, it's the same whiff of fragrance
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी 
In solitude, near me, is your same beautiful sight

सारे  जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे  
Though everything is the same, where has our passion gone?
              आले गेले वसंत, धुंदी आजही  तशी 
Seasons have come and gone; the passion is still the same
मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे  
It's the same me, 'it's the same you; where has that love gone?
              मीही तोच, तीच तूही, प्रीती तीच आपुली
It's the same me, it's the same you, it's the same love between us
ती न आर्तता स्वरात, स्वप्न ते न लोचनी 
Our voices have lost that tenderness, our eyes have lost that dream
             तीच आर्तता स्वरात, रम्य स्वप्न लोचनी 
It's the same tenderness in our voices, the same dream in our eyes
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
In solitude, near me, is your same beautiful sight

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा  
The signs of our first love have blurred
            त्या पहिल्या प्रीतीच्या नाही लोपल्या खुणा 
The signs of our first love have hardly blurred
वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा 
In the dried up flowers, I am seeking a meaningless fragrance
            बहरल्या फुलात रंग, गंध दरवळे सदा 
The blooming flowers are forever colorful and fragrant
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी 
The song isn't quite coming together, the notes are so broken
            गीत आपले जुळून, नाचते सुरांतुनी 
Our song is as melodious; is dancing through the notes
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी 
In solitude, near me, is your same beautiful sight

Friday, April 22, 2011

आव्हान ... २०११

तुझ्या थरथरत्या हातांचा मला आशिर्वाद नको
तुझ्या सुरकुत्यांत समावलेला अनुभव हवा

माझे न थरथरणारे हात तू जरूर वापर
आणि ते कसे वापरावे हे मला शिकव

सहस्र चन्द्र अन् ऐंशी पावसाळे
कसे आनंदात घालवावे हे आम्हां दाखव

हसत हसत मृत्यूला सामोरे जाताना
अलिप्ततेचे जिवंत उदाहरण उभारून दे

तुझी पाने उगीच नाही पिकली
पडण्या आधी अजून काही शिकवून जा

Thursday, April 21, 2011

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं ... मंगेश पाडगावकर

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं

जेवताना आजोबा लाडात येत
आणि मला आपल्या ताटातली भाकर देत
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत
मी म्हणायचे रागावून, "आजोबा, bad manners, what are you doing?"
आजोबांचं हसून उत्तर, "I am just ढेकरing"

आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल
आजोबा म्हणायचे, "ज्यांना असतं टक्कल, त्यांनाच असते अक्कल"
मी खिजवून म्हणायचो, "yamaka साठी घ्या आता buckle"
मग आजोबा मोठ्याने ओरडून म्हणायचे,
"अरे साल्या चमक्या, मला देतो धमक्या?
यमकांच्या ह्या धंद्यात मी आहे खमक्या"

मी जवळ गेले की मला म्हणत,
"बेटा एक लक्षात ठेव - एकटं एकटं जातां आलं पाहिजे
आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे"
मग मी गोंधळत विचारायचे, "आजोबा म्हणजे हो काय?"
आजोबा मोठ्याने हसून म्हणत,
"म्हणजे काय, म्हणजे काय? म्हणजे नाकात दोन पाय!"

"आजोबा आजोबा, एक गोष्ठ विचारू?
आजोबा आजोबा, तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो?"
"अरे वाह, होत्या म्हणजे काय, होत्याच की
एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती"
"आजोबा, अशी तशी म्हणजे कशी?"
आजोबा सांगणार तेव्हढ्यात खोलीत आजी यायची
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची
आजोबा स्वत:ला आवरायचे, आणि विषय बदलायचे, घसा खाकरत म्हणायचे,
"बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आरामखुर्चीवर एकटेच बसत
एक टक डोळे लाऊन दूर कुठे बघीत असत
कुठल्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणार्या जगात असत
पाय न वाजविता मी हळूच तिथे जाई, त्यांच्या आरामखुर्चीमागे उभी राही
काय बघीत असतील हे? मी दूर पाही, मला वेगळे दुसरे काही दिसत नसे
तीच झाडं तीच घरं, सगळं काही तसच असे
पाय न वाजवता मी हळूच परत घरात यायची
आणि आजोबांची आरामखुर्ची सावल्यांमधे बुडून जायची

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं

Sunday, August 15, 2010

सहस्र चन्द्र ... २०१०

एकाच त्या क्षणात मी सहस्र चन्द्र पाहिले
एका तिच्या नजरेत माझे आयुष्य सारे सार्थिले
काय अर्थ राहिला उभ्या जीवनात अता
पुन्हा नजर तिची मिळो, पुनर्जन्म होवो मला

Sunday, August 1, 2010

अरेरे मूर्तिकारा ... सीताराम चंदावरकर ... २०१०

देवा रे देवा! काय रे तुझी दशा
कोण आहे जबाबदार या सर्वाला
पाहून आपलेच प्रतिबिम्ब
तू म्हणे करतोस माणूस
तू जसा होतास छान
तसाच तोही होता छान

आता झालं आहे तरी काय?
तुझे प्रतिबिम्ब बदलले काय?
तू बदललास तेव्हाच तुझे प्रतिबिम्ब बदलले
आणि जितकी तुझी रूपे, प्रतिबिम्बे तितकीच
आणि ओघानंच माणसं तशीच अन् तितकीच

Saturday, May 23, 2009

सुख दु:ख ... सीताराम चंदावरकर ... २००९

एकदा दुःखाचे दार वाजले
आणि नवल वर्तले!
युगा युगाची वाट पाहिली
"तो" सुख आला दारी!

हिंडून हिंडून सुख झाला होता
जर्जर, तोंड काळवंडलेले
कपडे फाटलेले मळलेले
दोघे क्षणार्ध बघत राहीले

ओळख आता पटली
एकमेकांना मिठी मारली
दुःख दुःख राहिला नाहीं
सुख सुख राहिला नाहीं

आणि होऊं नये तेच घडले होते
मॅटर एँटि मॅटर होते भेटले होते
एक कृष्णविवर निर्माण झाले होते
सर्व ब्रह्मांड त्यांत ओढले गेले होते

दुस-याच क्षणार्धात पुनः महा स्फोट
पुन्हा नवीं विश्वें, पुन्हा नव्या आकाशगंगा
नव्या तारका, नवे सूर्य, नवे ग्रह झाले
आणि सुख दुःख दोघे जुळे भाऊ जन्मले

पुन्हा ते यात्रेत गेले, तेथे पुन्हा हरवले
युगें युगें हेंच होत आहे मीलनांतीं वियोग
वियोगानंतर मीलन असेंच चालत राहील
जीवनाचा क्रम युगे युगे चालत राहील

Sunday, February 15, 2009

आरामखुर्चीवरून शेळ्या हाकतो ... २००९

पाठीला कणा नसल्यामुळे
मी उंटावर चढत नाही
आरामखुर्चीत बसल्याशिवाय
मी शेळ्या हाकत नाही

दूरध्वनीच्या सोयीने
शेळ्या सहज हाती येतात
दहा आकडे फिरवले
की मी सांगतो तिथे जातात

माझ्या आरामखुर्चीभवती आहे
माझी आरामचौखडी (comfort zone)
त्यात सुखरूप राहते
पवित्र भारतीय संस्कृती

कुणी कसे रहावे
कुणी किती खचावे
संस्कृतीची अब्रू राखीत
कुणी आयुष्य खर्चावे

कुणी अपेक्षा करावी
एका रम्य पहाटेची
कुणी उपेक्षा सहावी
रात्रभर आयुष्याची

कुणाची व्यथा
होते माझी कथा
काय उचित, काय अनुचित
याची लागून राहिली द्विधा

मीच न्यायमूर्ती
अन् मीच आहे वकील
माझ्याविना कोण
नैतिकतेचे ओझे वाहील

तेच ओझे सावरीत
आरामखुर्चीत बसतो
दहा आकडे फिरवीत
शेळ्या हाकू लागतो













Saturday, July 5, 2008

नाराज तू तरीही ... सीताराम चंदावरकर ... २००८

("रंजिश ही सही" या गजलचे रूपांतर)

नाराज तू खरी, दिल दुखविण्यासाठी तरी ये
ये, आणिक पुन्हा मज सोडून जाण्यासाठी तरी ये

नसू देत पूर्वीचे ते संबंध आता तरीही
रिवाज काही दुनियेचे निभाविण्यासाठी तरी ये

कुणा कुणाला सांगावी विलगतेची कारणे मी
राग असो तुझा मजवरी, जमान्यासाठी तरी ये

ठेव की भान माझ्या प्रीतीच्या गर्वाचे जरातरी
तूही कधी माझी समजूत काढण्यासाठी तरी ये

किती दिसांचा मुकलेला मी अश्रूंच्या स्वादाला
प्राणाभिरामा! पुन्हा मज रडविण्यासाठी तरी ये

Wednesday, May 14, 2008

आशाकिरण ... कुंदा जुमडे यांनी केलेला स्वैर अनुवाद ... २००८

कल्लोळ उठे क्षण एक
तम अफाट भवती दाटे
परि शुभ्र किरण आशेचा
दूरातुन मजसी खुणवे

आनंद, प्रेम, सौख्यांचा
लाभेल किरण मज ख़ास
मनी ध्यास आत्मतृप्तीचा
लाभेल नसे तो भास!

Tuesday, May 13, 2008

अधुरी कविता ... २००८ ... अशोक जुमडे यांनी केलेला अनुवाद

सौख्य, वेदना, आशा आणि सांत्वना
तू सर्व काही, माझी अधुरी कविता

दाहक आणि शीतल, जवळीक आणि दुरावा
कधी पूर्णत्वाला जाशील, माझी अधुरी कविता

धूसर भूतकाळ आणि उज्वल भविष्य
वर्तमानाची दिशा दाखव, माझी अधुरी कविता

शब्द, मात्रा, गण, सगळे काही जुळले
गायिकेच्या शोधात आहे, माझी अधुरी कविता

Tuesday, May 6, 2008

एक रम्य सकाळ ... अशोक जुमडे यांनी केलेला अनुवाद ... २००८

आला स्वप्नांचा मधुमास
फुलांचा हा ओला सुवास

सूर्यकिरणी विरतात धुक्याचे ढग
दिसते मखमली शेवाळ्याची चमक

ओलसर धुक्यात कमळ उमलते
आणि भाविष्यरंग चमकू लागतात

Wednesday, March 12, 2008

आणखी एक गंमत ... सीताराम चंदावरकर

चणे जेव्हां होते खायचे
तेव्हां खाल्ले लोखंडाचे
देव नाही जरी झालों
चक्कीचा पाटाच झालों

देव व्हावे किंवा व्हावे जातें
हे दगडाच्या हातीं कुठे असते?
मृत्यूनंतर मुक्ती देणे माझ्या हाती नसे
भुकेल्याला पीठ देतों, थोडके का हे असे?

हल्ली मृत्यु घरी नव्हे, आयसीयूत येतो
जवळ नातलग नव्हे, डॉक्टर असतो
गंगा कुठली, खारट सलाय्न असतो
अन् सगळा खेळ तिथेच आटोपतो

जीवनी अनेकांना पाणी होते पाजले
आणि अनेकानी मलाही होते पाजले
मृत्युशय्येवर आता तहान राहिली नाही
पाणी पाजण्याची गरजच उरली नाही

Saturday, February 23, 2008

पाकदेवतेस प्रणाम ... 2006

ऐसे नव्हे की आम्ही कधी नास्तिक होतो
पाकदेवतेचे आम्ही नेहमीच भक्त होतो

घेतले घोट दोन, पण नैवेद्य तिला दावुनी
मोक्ष साधिला कधीच, ऐसे पंचामृत प्राशुनी

हृदये सांभाळती काही श्रीफळे वर्जुनी
मधुमेही मुंगळे परी गुळाला चिकटती

यकृते आम्ही अजुनी जोपासुनी ठेविली
वार्धक्यात कुणा आहे का कुणी सांगाती

पुनश्च सुरू झाली ही रम्य पाकचर्चा
ऐसीच पूर्ण होवो ही उदरतृप्तीची अपेक्षा

Monday, January 14, 2008

स्वप्नातले स्वप्न ... २००८

(I must admit the strong influence of the style of Late Bhausaheb Patankar in the following poem)

स्वप्नातल्या स्वप्नात मी स्वप्न एक पाहतो
छतावरील पंखा बघीत मी उभी रात्र काढतो


स्वप्नातल्या स्वप्नात मी असा जागा राहतो
पहाट होता होता कुठे डोळा जरासा लागतो

रम्य असते ती सकाळ, अन् ऊन्ह असते कोवळे
पक्षी असत किलबिलत, अन् पशु विहरत मोकळे

इतक्यात होते दर्शन तिचे, धन्य होतो मी किती

पण स्वप्न तेथेच संपते, अन् येते पुन्हा ती जागृती

पुन्हा स्वप्नात मी जागा, तेच छत अन् तोच पंखा
स्वप्नातल्या स्वप्नात पुन्हा स्वप्नाची तीच प्रतीक्षा

Friday, January 11, 2008

माझे तळे - सीताराम चंदावरकर ... २००७




माझ्या घरापाशी आहे एक तळे
लहान साजिरे, गोजिरवाणे

येते कोठून हे पाणी, जाते कुठे हे पाणी
जीवनाचे गूढ़ सांगते का हे पाणी?

माझ्या तळयाचे पाणी, आरसा बिलोरी
रुप पाहताती ढगांच्या त्या पोरी

पाण्याची कारंजी पाहुनी सूर्य
अर्पितात भावे इद्रधनूचे अर्ध्य

तळ्याच्या काठाशी, झिंज्या वाढवून
आपुलेच बिंब न्याहाळीत willow आहे बसून

आणिक पादपांनी हात उंचाविले
मानाया आभार त्या अनंताचे

बदके आणि पिल्ले इथे आनंदे राहती
सुरूप कि कुरूप हा भेदभाव नाही

आनंदे राहावे अन् इतरां संतोषावे
संदेश साधा हा देते तळे माझे

आनंद तरंग माझ्या तळ्यामाजी
राहोत फुलत सदा सुखाची कारंजी

वाटले कधी नको संसाराचा येरझार
परी लावियते हे तळे जिवा वेड फार

निर्वाण ... २००५

निवांत बसुनी घोट चहाचा नुकताच गिळला होता
गात्रांतून एक कळ आली, रक्तदाब घटला होता

नाडी हरवली, चष्म्यावर एक धुकेसे आले
विस्मृत स्मृतींचे डोळ्यासमोर स्पष्ट दर्शन झाले

तुंबलेली मुंबई, ८:१४ लोकल, 'आपली आवड', 'कामगार सभा'
दंगे मोर्चे, शिवाजी मंदिर, फ्लूची साथ, रेशनच्या रांगा

कुलकर्ण्यांचे वडे, शिवसेनेचा झुणका, मामा काण्यांची मिसळ
वह्याना कव्हरं, चोरलेले गृहपाठ, गहूं-तांदळातील भेसळ

माझ्या डोळ्यांसमोर उभा नायगराचा जलविस्तार
जिभेवर मुंबईच्या नळाची चविष्ठ क्लोरीनयुक्त धार

आप्त सर्व आले, देऊन खांदा गेले
खुंटीवर ज्यांच्या नेहमीच पंचे टांगलेले

किती ती घाई जाळून परतण्याची
नळ जाण्याआधी आंघोळ आटोपण्याची

खिडकीच्या गजांतून पाहतो "असीम" मजा
म्हणती, 'मरेपर्यंत जीवंत होता' - किती सूज्ञ ही प्रजा

Thursday, January 10, 2008

वाट पाहतो ... २००३

मी वाट पाहतो, मी वाट पाहतो
अज्ञात पहाटेची मी वाट पाहतो

किती साधु-संत आले नि गेले
शिवण्यास अछूतास मी वाट पाहतो

उत्कर्ष जीवनाचा उपभोगुद्या मला
व्याख्यान संपण्याची मी वाट पाहतो

उष:काल झाला, भूपाळी आली कानी
पाववाल्याची मी वाट पाहतो

रे पुरोहिता! एक घोट तरी घ्यावा
तव मोक्षतेची मी वाट पाहतो

आयुष्य एकट्याचे ... २००२

आयुष्य एकट्याचे, कळले तुझ्यासवे
नयन खुष्क झाले, सोबतीला आसवे


कैफात मैफिलीच्या मी मदोन्मत्त झालो
होते जरी अनेक, का एकटाच प्यालो ?

माझी गजल अपुरी, गेली कुठे ती शायरी?
शब्द रेंगाळती का, येते जरी बाराखडी?

ताटीवरी "असीम", आता देतेस तू उसासे!
आयुष्य एकट्याचे, कळले तुझ्यासवे