Friday, January 11, 2008

माझे तळे - सीताराम चंदावरकर ... २००७




माझ्या घरापाशी आहे एक तळे
लहान साजिरे, गोजिरवाणे

येते कोठून हे पाणी, जाते कुठे हे पाणी
जीवनाचे गूढ़ सांगते का हे पाणी?

माझ्या तळयाचे पाणी, आरसा बिलोरी
रुप पाहताती ढगांच्या त्या पोरी

पाण्याची कारंजी पाहुनी सूर्य
अर्पितात भावे इद्रधनूचे अर्ध्य

तळ्याच्या काठाशी, झिंज्या वाढवून
आपुलेच बिंब न्याहाळीत willow आहे बसून

आणिक पादपांनी हात उंचाविले
मानाया आभार त्या अनंताचे

बदके आणि पिल्ले इथे आनंदे राहती
सुरूप कि कुरूप हा भेदभाव नाही

आनंदे राहावे अन् इतरां संतोषावे
संदेश साधा हा देते तळे माझे

आनंद तरंग माझ्या तळ्यामाजी
राहोत फुलत सदा सुखाची कारंजी

वाटले कधी नको संसाराचा येरझार
परी लावियते हे तळे जिवा वेड फार

No comments: