मुंबईतला काय, न्यू जर्सीतला काय, तोच मजेशीर, मुसळधार पाउस
तो व्यर्थ झाला लहानपणच्या संयमात, तर हा बहरतोय तारुण्याच्या धुंदीत
मानलेल्या ह्या देशात नाही सौंदर्याची कमी,
भूतकाळाच्या आठवणी ठेऒन, मी वर्तमान गमावणार नाही!
"केस ओले होतील …", आता त्याची काळजी नाही
सर्दी खोकला, कावीळ मलेरिया, आता त्याची पर्वा नाही
"लहानपण देगा देवा", कुणी थोर म्हणून गेला
बिचाऱ्याने तारुण्याची, नसेल कधी चाखली हवा
मेंढरासारखा बालपणी, मीही गेलो टिटवाळ्याला
नळाला कान लावला, पंढरपूरचा मृदंग ऐकला
वात्रट आम्ही, घरी येउन, दादरच्या नळाला कान दिला
काय आश्चर्य! विठोबा तेथेही नळात भेटला!
कालच कुणी घाबरत विचारले, "Club-55ला येणार का?"
माझे तुरंत त्याला उत्तर, "Club-25ची पायरी चढायचीय अजून आम्हाला"
कीव येते त्यांची, जे जन्मतारखेने आपली वयं मोजतात
पर्वतीची गुलाबी थंडी कानटोपीने दूर ठेवतात
स्वैर मनाने भिजावे, मुक्त दिलाने रहावे
आजचे हे मौल्यवान क्षण, हातात जपून ठेवावे

No comments:
Post a Comment