एकदा दुःखाचे दार वाजले
आणि नवल वर्तले!
युगा युगाची वाट पाहिली
"तो" सुख आला दारी!
हिंडून हिंडून सुख झाला होता
जर्जर, तोंड काळवंडलेले
कपडे फाटलेले मळलेले
दोघे क्षणार्ध बघत राहीले
ओळख आता पटली
एकमेकांना मिठी मारली
दुःख दुःख राहिला नाहीं
सुख सुख राहिला नाहीं
आणि होऊं नये तेच घडले होते
मॅटर एँटि मॅटर होते भेटले होते
एक कृष्णविवर निर्माण झाले होते
सर्व ब्रह्मांड त्यांत ओढले गेले होते
दुस-याच क्षणार्धात पुनः महा स्फोट
पुन्हा नवीं विश्वें, पुन्हा नव्या आकाशगंगा
नव्या तारका, नवे सूर्य, नवे ग्रह झाले
आणि सुख दुःख दोघे जुळे भाऊ जन्मले
पुन्हा ते यात्रेत गेले, तेथे पुन्हा हरवले
युगें युगें हेंच होत आहे मीलनांतीं वियोग
वियोगानंतर मीलन असेंच चालत राहील
जीवनाचा क्रम युगे युगे चालत राहील
No comments:
Post a Comment