Saturday, July 5, 2008

नाराज तू तरीही ... सीताराम चंदावरकर ... २००८

("रंजिश ही सही" या गजलचे रूपांतर)

नाराज तू खरी, दिल दुखविण्यासाठी तरी ये
ये, आणिक पुन्हा मज सोडून जाण्यासाठी तरी ये

नसू देत पूर्वीचे ते संबंध आता तरीही
रिवाज काही दुनियेचे निभाविण्यासाठी तरी ये

कुणा कुणाला सांगावी विलगतेची कारणे मी
राग असो तुझा मजवरी, जमान्यासाठी तरी ये

ठेव की भान माझ्या प्रीतीच्या गर्वाचे जरातरी
तूही कधी माझी समजूत काढण्यासाठी तरी ये

किती दिसांचा मुकलेला मी अश्रूंच्या स्वादाला
प्राणाभिरामा! पुन्हा मज रडविण्यासाठी तरी ये

No comments: