चणे जेव्हां होते खायचे
तेव्हां खाल्ले लोखंडाचे
देव नाही जरी झालों
चक्कीचा पाटाच झालों
देव व्हावे किंवा व्हावे जातें
हे दगडाच्या हातीं कुठे असते?
मृत्यूनंतर मुक्ती देणे माझ्या हाती नसे
भुकेल्याला पीठ देतों, थोडके का हे असे?
हल्ली मृत्यु घरी नव्हे, आयसीयूत येतो
जवळ नातलग नव्हे, डॉक्टर असतो
गंगा कुठली, खारट सलाय्न असतो
अन् सगळा खेळ तिथेच आटोपतो
जीवनी अनेकांना पाणी होते पाजले
आणि अनेकानी मलाही होते पाजले
मृत्युशय्येवर आता तहान राहिली नाही
पाणी पाजण्याची गरजच उरली नाही
No comments:
Post a Comment