तुझ्या थरथरत्या हातांचा मला आशिर्वाद नको
तुझ्या सुरकुत्यांत समावलेला अनुभव हवा
माझे न थरथरणारे हात तू जरूर वापर
आणि ते कसे वापरावे हे मला शिकव
सहस्र चन्द्र अन् ऐंशी पावसाळे
कसे आनंदात घालवावे हे आम्हां दाखव
हसत हसत मृत्यूला सामोरे जाताना
अलिप्ततेचे जिवंत उदाहरण उभारून दे
तुझी पाने उगीच नाही पिकली
पडण्या आधी अजून काही शिकवून जा
No comments:
Post a Comment