(I must admit the strong influence of the style of Late Bhausaheb Patankar in the following poem)
स्वप्नातल्या स्वप्नात मी स्वप्न एक पाहतो
छतावरील पंखा बघीत मी उभी रात्र काढतो
स्वप्नातल्या स्वप्नात मी असा जागा राहतो
पहाट होता होता कुठे डोळा जरासा लागतो
रम्य असते ती सकाळ, अन् ऊन्ह असते कोवळे
पक्षी असत किलबिलत, अन् पशु विहरत मोकळे
इतक्यात होते दर्शन तिचे, धन्य होतो मी किती
पण स्वप्न तेथेच संपते, अन् येते पुन्हा ती जागृती
पुन्हा स्वप्नात मी जागा, तेच छत अन् तोच पंखा
स्वप्नातल्या स्वप्नात पुन्हा स्वप्नाची तीच प्रतीक्षा
No comments:
Post a Comment