उत्सुक जो तो दिवे लाविण्या, प्रत्येकाला दिवा हवा
अंधाराचे दिवस येताहेत; दिवा दिवा जमवायला हवा
हृदय आसुसलेले अभिसाराला, दूर वाजला पावा
अंधाराच्या वाटेवरती कोणा कशास दिवा हवा?
षड्रिपूंची वस्त्रें काळी गळतील, नि थांबेल ही तो पावा
रात्र अंधारी अशीच राहू दे, दिवस न कधी उजडावा
सोडुनी दिधले गणगोत सारे, अन् दूर लोटिले गावा
आता येणे परतुन नाही, कशास मज मग दिवा हवा
No comments:
Post a Comment