एकदा माझी पार्ले बिस्कीटं
करकरीत पुड्यात अखंड होती
नंतर मी निर्यात झालो
बिस्कीटं निर्यात झाली
तोच करकरीत पुडा
पण त्यात तुटकी बिस्कीटं
म्हणतो, दुरून आली आहेत
शीण लागला असावा
चव तीच आहे
कुरकुरीत देखील आहेत
तुटली तर काय झालं?
माझीच बिस्कीटं आहेत
करकरीत पुड्यात अखंड होती
नंतर मी निर्यात झालो
बिस्कीटं निर्यात झाली
तोच करकरीत पुडा
पण त्यात तुटकी बिस्कीटं
म्हणतो, दुरून आली आहेत
शीण लागला असावा
चव तीच आहे
कुरकुरीत देखील आहेत
तुटली तर काय झालं?
माझीच बिस्कीटं आहेत
No comments:
Post a Comment